श्री कृष्णावेणी उत्सव 2023 (श्री क्षेत्र नरसोबावडी)



"मच्चिता चिंती साची तू वाडी नरसोबाची असा श्री क्षेत्र नरसोबावाडीचा अलौकिक महिमा प्रेमभराने गाणारे व श्री क्षेत्र नृसिंहवाडीचे आम्ही आहोत" असे स्वानंदाने सांगणारे श्रीमत् प. प. वासुदेवानंद सरस्वती टेंब्ये स्वामी महाराज वाडी क्षेत्री एकदा वास्तव्यास असताना आपल्या अतिशय प्रिय पुजारी वाडीकर भक्तजनांना श्रीकृष्णा-पंचगंगेच्या अनादि संगमावर श्रीकृष्णा मातेचे अगाध माहात्म्य आपल्या देववाणीतून प्रकट करीत असतानाच एक "कनकी नामक देववृक्षाचे श्रीकृष्णावेणीचे अमूर्त स्वरूप वाहत आल्याचे त्रिकाल ज्ञानी महाराजांच्या ऋतंभरा प्रज्ञेस ज्ञात झाले भावावस्था प्राप्त महाराजांनी एका भक्ताकरावी या कृष्णेच्या अमूर्त स्वरूपास आपल्याजवळ आणले. प. प. स्वामींना त्रिपुरसुंदरी श्रीकृष्णावेणी मातेने जे मनोहरी दर्शन दिले त्याप्रमाणे या 'श्रीकृष्णावेणीच्या' अमूर्त स्वरूपाला अतिशय सुंदर असे मूर्ती स्वरूप देण्यात आलेतीच ही आपली सर्वांची जीवनदायिनी श्री कृष्णावेणी माता...

श्री दत्तात्रेयांचे द्वितीय अवतार श्रीमन नृसिंहसरस्वती स्वामी महाराजांच्या बारावर्षांच्या तपःसाधनेने पावनमय झालेल्या कृष्णा-पंचगंगा संगमावरील श्री नृसिंहवाडी क्षेत्री प.प. थोरले (स्वामी (टेंब्ये स्वामी) महाराजांच्या सत्यसंकल्पाने श्रीकृष्णावेणी मातेचा उत्सव होत आहे.

श्रीकृष्ण वेणी मातेचा उत्सव वेळापत्रक खालील प्रमाणे 

|| श्री कृष्णावेणी प्रसन्न ||

स.न.वि.वि. प्रतिवर्षाप्रमाणे

श्री कृष्णावेणी उत्सव - २०२३ श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथे मिती माघ शु. ७ (रथसप्तमी) शनिवार दि. २८ जानेवारी ते माघ कृ. ॥। १ सोमवार दि. ६ फेब्रुवारी २०१३ अखेर १० दिवस साजरा होणार आहे.

उत्सव प्रसंगी होणारे नित्य कार्यक्रम
सकाळी ७.०० वा.
सकाळी ८.०० वा. : ऋक्संहिता, ब्राह्मण आरण्यक्, श्री गुरुचरित्र, कृष्णा माहात्म्य,

श्रीमद् भागवत, श्रीसूक्त, रुद्रैकादशिनी, सप्तशती इ. पारायणे आरती
दुपारी १:०० वा.
: श्री. एकवीरा भगिनी मंडळ, श्री क्षेत्र नृसिंहवाडी यांचे
दुपारी ३:०० ते ४:००
"श्री कृष्णालहरी पठण
सायं. ४.०० ते ५.०० वा.
: वे. मू. श्री. हरी नारायण पुजारी (चोपदार), नृसिंहवाडी यांचे 'श्री कृष्णालहरी पुराण" 
रात्री ८.०० वा.पूजा
 अर्चा : आरती व मंत्रपुष्प

विशेष कार्यक्रम

शनिवार, दि. २८ जानेवारी २०२३
सायं. ५ वा.
श्री. प्रसाद शेवडे, देवगड यांचे 'गायन'
रात्री ९:३० वा. ह. भ. प. श्री. नंदकुमारबुवा कर्वे, पनवेल यांचे 'सुश्राव्य कीर्तन'

रविवार, दि. २९ जानेवारी २०२३
सायं. ५ वा. श्री. भाग्येश मराठे, मुंबई यांचे 'गायन'
रात्रौ. ९:३० वा. ह.भ.प.श्री.नंदकुमारबुवा कर्वे, पनवेल यांचे 'सुश्राव्य कीर्तन'

सोमवार, दि. ३० जानेवारी २०२३
सायं. ५ वा.
सौ. मृणाल नाटेकर - भिडे, मुंबई यांचे 'गायन' रात्री ९:३० वा. ह. भ. प. श्री. नंदकुमारबुवा कर्वे, पनवेल यांचे 'सुश्राव्य कीर्तन'

मंगळवार, दि. ३१ जानेवारी २०२३
श्री. सुभाष परवार, गोवा यांचे 'गायन'
सायं. ५ वा. रात्रौ ९:३० वा. ह. भ. प. श्री. नंदकुमारबुवा कर्वे, पनवेल यांचे 'सुश्राव्य कीर्तन'

बुधवार, दि. १ फेब्रुवारी २०२३
सकाळी 8 वा. " श्री विष्णुयाग"
सायं. ५ वा. ह. भ. प. श्री. नंदकुमारबुवा कर्वे, पनवेल यांचे 'सुश्राव्य कीर्तन'
रात्रौ ८ वा. " मंत्रजागर " रात्री ९:३० वा. " गर्जली स्वातंत्र्य शाहिरी " सादरकर्ते आचार्य शाहीर हेमंतराजे पु. मावळे आणि सहकारी, (नानिवडेकर- हिंगे मावळे शाहिरी घराण्याचे उत्तराधिकारी) पुणे

गुरुवार, दि. २ फेब्रुवारी २०२३
सायं. ५ वा. ह. भ. प. श्री. नंदकुमारबुवा कर्वे, पनवेल यांचे 'सुश्राव्य कीर्तन रात्रौ ९:३० वा. पं. श्री. शौनक जितेंद्र अभिषेकी, पुणे यांचे 'गायन'

शुक्रवार, दि. ३ फेब्रुवारी २०२३
सायं. ५ वा.
ह. भ. प. श्री. नंदकुमारबुवा कर्वे, पनवेल यांचे 'सुश्राव्य कीर्तन' रात्रौ ९:३० वा. 'नाम घेऊ नाम गाऊ' भक्तिगीत गायन संकल्पना संगीत दिग्दर्शन- प्रस्तुती श्री. प्रदीप धोंड - पिंगुळी, कुडाळ. (मुंबई)

शनिवार, दि. ४ फेब्रुवारी २०२३
सायं. ५ वा. ह. भ. प. श्री. नंदकुमारबुवा कर्वे, पनवेल यांचे सुश्राव्य कीर्तन रात्री ९:३० वा. पं. श्री. रघुनंदन पणशीकर, पुणे यांचे 'गायन'

रविवार, दि. ५ फेब्रुवारी २०२३
सायं. ५ वा. ह. भ. प. श्री. नंदकुमारबुवा कर्वे, पनवेल यांचे 'सुश्राव्य कीर्तन'
रात्रौ ८ वा. श्रीमद् जगदुरु शंकराचार्य, करवीर पीठ यांचे आशीर्वचन " रात्री ९:३० वा. कु. मृदुला तांबे, पुणे यांचे 'गायन'






सोमवार, दि. ६ फेब्रुवारी २०२३
सायं. ५ वा. श्री. अतुल खांडेकर, पुणे यांचे 'गायन' 
रात्री ९:३० वा. ह. भ. प. श्री. शरद दत्तदासबुवा घाग, नृसिंहवाडी यांचे सुश्राव्य कीर्तन'












No comments:

Post a Comment